स्वयंसिद्धा – कृषकलक्ष्मी

>> डॉ. जयश्री जाधव-कदम

यशस्वी शेती करत, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलत  कृषकलक्ष्मी आपले अस्तित्व सिद्ध करणाऱया कल्पना शंकपाळ या खऱया कृषकलक्ष्मी आहेत.

महिला शेतीचे व्यवस्थापन उत्तम करतातच, पण पतीची जबाबदारी स्वतच्या खांद्यावर घेऊन यशस्वी शेती करणारी कृषकलक्ष्मी कल्पना आपले अस्तित्व सिद्ध करण्यात सक्षम ठरली. स्वतच्या शेताचे हिरवेगार नंदनवन करून स्वतची द्राक्ष शेती हिंमतीने कणखर मनाने आणि मनगटातील बळाने रात्रंदिवसाच्या मेहनतीने उभी केली. नाशिक जिल्हय़ातील निफाड तालुक्यातील कारसूळ येथील कल्पना शंकपाळ यांनी यशस्वी द्राक्ष शेती उभी करून जोडीला सोयाबीन, हळदीचे उत्पादन घेतात. शेतीतील यश मिळविण्यासाठी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण प्रचंड मेहनत आणि जिद्दीने कौटुंबिक जीवनाला आकार दिला. कारसूळ येथील पदवीधर वसंत शंकपाळ आणि कल्पना यांचा विवाह 2000 मध्ये झाला. लग्न झाले तेव्हा कल्पनाचे वय अवघे 18 वर्षे होते व शिक्षण फक्त इयत्ता 9 वीपर्यंतच झालेले. वडिलांचे छत्र नव्हते. त्यामुळे काकांनीच लग्न लावून दिले. कल्पनाचे पती वसंत शंकपाळ यांचे शिक्षण श्.ण्दस्. पर्यंत झालेले, रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांनी शेती व्यवसायातच लक्ष घातले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवताना रंगबिरंगी सप्तरंगात काळ्या रंगाने अवघ्या पाच वर्षांतच प्रवेश केला. कल्पनाच्या पतीची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. पतीची दृष्टी वाचविण्यासाठी सलग 9 वर्षे प्रवास करून मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना बाळगलेल्या आशाही हळूहळू मावळल्या. डॉक्टरांचे प्रयत्न थांबले, परंतु कल्पनाताई पतीला विदेशातही उपचार मिळाला तरी स्वत खर्च करून पतीला पुन्हा दृष्टी मिळवून देण्याची आशा होती. कल्पनाताईंनी शांतपणे, संयमाने आपली दिनचर्या सुरूच ठेवली. कल्पनाताई पतीच्या डोळ्यांनी शेती करत. पतीबरोबर चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेऊन शेती पिकवली. नशिबाला दोष न देता पतीला स्वतच्या डोळ्यातून दृष्टी आणि सृष्टी दाखवत खंबीरपणे कुटुंबाचे मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व स्वीकारून कामाला लागल्या. शेती कसण्यासाठी कंबर कसली. निसर्ग साथ देत नसे. पण हार न मानता  प्रत्येक आव्हानाचा सामना करत शेतीचे नंदनवन केले. कौटुंबिक आधाराशिवाय एक महिला शेती कशी करणार? पतीचा आधार नाही, द्राक्ष शेतीचे अपुरे ज्ञान… शेती करण्याचे धाडस कल्पनाने करू नये म्हणून अनेकांनी कल्पनाला शेती विकण्याचा व वाटय़ाने देण्याचा सल्ला दिला. पण कल्पनाने लक्ष न देता सतत दोन्ही हात कामात गुंतवले. महिला शेतीचे व्यवस्थापन उत्तम करतातच, पण पतीची जबाबदारी स्वतच्या खांद्यावर घेऊन यशस्वी शेती करणारी कल्पना आपले अस्तित्व सिद्ध करण्यात सक्षम ठरली. स्वतच्या शेताचे हिरवेगार नंदनवन करून स्वतची द्राक्ष शेती हिमतीने कणखर मनाने आणि मनगटातील बळाने रात्रंदिवसाच्या मेहनतीने उभी केली. पती आणि मुलासाठी कधी मोडायचे नाही, अडून पडायचे नाही हाच ध्यास तिने घेतला. शेतीचा कोणताही अनुभव नसताना पतीच्या ज्ञानाचे बळ स्वतकडे घेतले. तन-मन-धन जोडीला भविष्याचा दृष्टिकोन ठेवून पतीच्या मार्गदर्शनाने आणि कष्टामुळे ढेकळांनासुद्धा पाझर फुटला. शेतीसाठी घेतलेले बँकेचे कर्ज नियमितपणे फेडते. बँकेनेदेखील कल्पनाचा सत्कार करून तिच्या कार्याला सलाम केला.

कल्पनाताई कृषीची साक्षात लक्ष्मी `कृषकलक्ष्मी’ बनल्या. स्वतचे हक्काचे लाखो रुपये खर्च करून घर बांधले. टू-व्हीलर (स्कुटी) विकत घेऊन ती स्वत चालविण्यास शिकल्या. अंध पतीला मागे बसवून शेतातील कामासाठी तसेच इतर कोणत्याही ठिकाणी जोडीने प्रवास करत. स्वतच्या मालकीचा

ट्रक्टरही घेतला, चालविण्यास शिकल्या आणि हिमतीने द्राक्ष शेती उभी केली. शेतपिकाला पाण्यासाठी सामाईक विहीर असल्याने स्वत बारे देण्याचे काम दिवसा-रात्री  नियमानुसार करत. ट्रक्टर चालवून नांगरट करणे, कोळपणी करणे, फवारणीसारखी सर्व कामे स्वतच करतात. द्राक्षबागेत आंतरपीक घेऊन नफाही मिळवितात. मधल्या काळात वादळाने द्राक्षशेतीची परवड केली. लाखो-करोडोंचे नुकसान द्राक्ष बागायत शेतकऱयांना झाले. कल्पनाताईंनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही नव्वद क्विंटल द्राक्षाचे उत्पादन घेतले. इतर वेळी कमीतकमी 100 क्विंटलचे उत्पादन घेतात. त्यांच्या मेहनतीला नशिबाने साथ दिली. या सर्व घटनांचे साक्षीदार सर्व समाजसुद्धा आहे. कुणाचा आधार नसताना शेती यशस्वी करणे तेही एका स्त्राrने हा सर्व शेतकऱयांपुढे आदर्श आहे.

एका महिलेने द्राक्ष शेती उभी करणे अशक्य परंतु  स्त्राrमधील ताकद, आत्मविश्वास, निर्णयक्षमता या जोरावर कल्पनाने हे करून दाखवले. नशिबाला दोष न देता आलेल्या परिस्थितीचा सामना करणाऱया महिलांसाठी कल्पनाताई आदर्श आहेत. महिला सबलीकरणाचे खरोखर जिवंत उदाहरण आहे.

(लेखिका के.टी.एच.एम. कॉलेज नाशिक येथे अर्थशास्र  प्राध्यापक  आहेत.)

[email protected]