
राजमाता जिजाऊ म्हणजे महाराष्ट्राचे अधिष्ठान. छत्रपती शिवरायांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवणाऱया जिजाऊंनी महाराजांना राजकारणाचे धडे दिले, दूरदृष्टी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जन्म झालेल्या जिजाऊ या लखुजी जाधव यांच्या एकुलत्या एक कन्या. पराक्रमी मराठय़ांना सुलतानी सत्तेत स्थिरता व मान नाही हे जिजाऊंच्या लक्षात आले. याच दरम्यान शहाजीराजांनी पुण्याची जहागिरी जिजाऊंच्या हाती सुपूर्त केली. प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या पुण्याचा अगदी नेटाने जिजाऊंनी पुनर्विकास केला. शिवरायांचे प्रेरणास्थान बनत शहाजीराजांची कैद आणि सुटका, अफजल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद व सुटका अशा अनेक संकटांत महाराजांचे आणि स्वराज्याचे मनोबल त्यांनी जपले. शिवराय मोfिहमेवर असताना खुद्द जिजाऊ माँसाहेब राज्यकारभार पाहत. मराठय़ांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण करून शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर केवळ बारा दिवसांनीच म्हणजे 17 जून 1674 जिजाऊंचे पाचाड येथे निधन झाले. रायगडजवळीप पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचे समाधीस्थळ आहे. याच गावात महाराजांचे घोडदळ होते व इथे त्यांनी कोटाची निर्मिती केली होती.