…तर कुणाच्या मनात शंकाच उरणार नाही की मोदींनी मतं चोरून सत्ता काबीज केली, राहुल गांधी यांचे सूचक विधान

पुढच्या पत्रकार परिषदेत मतं चोरी कशी केली ते आम्ही अशा पद्धतीने दाखवणार आहोत की भारतात कुणालाच काहीही शंका राहणार नाही की नरेंद्र मोदीनी ‘वोट चोरी’ करून निवडणूक जिंकली आहे असे सूचक विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. तसेच आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहोत, त्यामुळे संपूर्ण सत्य बाहेर येणार आहे. याबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात वोट चोरीबाबत सीआयडी चौकशी सुरू आहे. सीआयडीने विशेषतः त्या फोन नंबरांविषयी माहिती मागितली आहे जी ‘वोट चोरी’ करण्यासाठी वापरली गेली आहेत. ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि कुमार कर्नाटक सीआयडीला ती माहिती ती देत नाही आहे.

पुढच्या पत्रकार परिषदेत मतं चोरी कशी केली ते आम्ही अशा पद्धतीने दाखवणार आहोत की भारतात कुणालाच काहीही शंका राहणार नाही की नरेंद्र मोदीनी ‘वोट चोरी’ करून निवडणूक जिंकली आहे. आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहोत, त्यामुळे संपूर्ण सत्य बाहेर येणार आहे. याबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.

सर्वात कमजोर पंतप्रधान
अमेरिकेने H1 B व्हिसावर 90 लाख रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे देशाचे आजवरचे सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.