
टी.एन शेषन यांच्यामुळे निवडणूक आयोगाला प्रतिष्ठा मिळाली, पण 2014 पासून आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली असे विधान जन सुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी केले आहे. तसेच राहुल गांधी यांनी जे आरोप केले आहेत ते गांभीर्याने घेतले पाहिजे असेही किशोर म्हणाले.
एका युट्युब चॅनलला मुलाखात देताना प्रशांत किशोर म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवे. जेव्हा टी.एन शेषन निवडणूक आयोगाचे आयुक्त झाले तेव्हा लोकांना कळायला लागले की निवडणूक आयोग नावाची संस्था आहे म्हणून. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिष्ठा दिली. त्यानंतर 2014 पर्यंत लोकांच्या मनात आयोगाबद्दल विश्वास होता की काही झालं तरी निवडणुका या निःष्पक्ष असतात. पण 2014 नंतर निवडणूक आयोगाच्या विश्वासाला तडा गेला असे प्रशांत किशोर म्हणाले.