भिवंडीत युरिया खताचा काळाबाजार, 266८ गोण्या जप्त; 12 जणांवर गुन्हा

भिवंडी तालुक्यातील कुरूंद गावच्या हद्दीतील की स्क्वेअर या गोदाम संकुलातील गोदामावर कृषी विभाग व पडघा पोलि सांनी छापा टाकून युरिया खताचा काळाबाजार उघड केला. या कारवाईत खताच्या 266८ गोण्या जप्त करण्यात आल्या. या अनुदानित खताची किंमत 78 लाख 11 हजार 736 रुपये असून पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पडघा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण पोलिसांना ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली होती. गोपनिय माहितीच्या एडके यांच्या पथकाने शनिवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील भोईरपाडा गावच्या हद्दीतील दाराज हॉटेल येथे सापळा रचून युरिया खत भरलेली तीन वाहने पकडली. वाहनांमध्ये औद्योगिक वापरासाठीच्या गोणींमध्ये युरिया खत भरलेल्या गोण्या होत्या. यानंतर लागलीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी युरिया जप्त करण्यात आला.

औद्योगिक वापरासाठी बेकायदा वापर
शेतकऱ्यांना बाजारात युरिया मिळत नसताना भिवंडीच्या गोदामात मात्र हाच युरिया मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला होता. शेतीसाठीचा युरिया औद्योगिक वापरासाठीच्या सफेद गोणींमध्ये भरून तो बाहेर पाठवला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथकाने कुरुंद येथील के स्क्वेअर लॉजिस्टीक पार्कमधील गोडाऊनमध्ये छापा टाकून युरियाचा काळा बाजार रंगेहात पकडला