
लोढा डेव्हलपर्स या नामांकित कंपनीत कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीला 85 कोटींचा चुना लावल्याप्रकरणी अटकेत असलेला कंपनीचा माजी संचालक राजेंद्र लोढा याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राजेंद्र लोढा हा लोढा डेव्हलपर्स कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होता. कंपनीने केवळ जागा संपादन करण्याचा अधिकार दिलेला असताना राजेंद्र याने जमीन विक्रीचादेखील व्यवहार केला होता. अन्य 9 जणांना साथीला घेऊन राजेंद्र याने मोठा झोल केला होता. हा प्रकार लक्षात येताच कंपनीचे मुख्य लायझन मोनिल घाला यांनी राजेंद्र लोढा व त्याच्या सहकाऱ्यांनी कंपनीची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने राजेंद्र याला अटक केली होती.






























































