
शिवसेना भवन येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ सायंकाळी 4 ते 7 या वेळेत शिवसेना भवनातील तिसऱ्या मजल्यावर होणार आहे. मुंबईतील सर्व महिला पदाधिकारी आणि महिला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.






























































