
राज्यातील महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींच्या यादीची काटछाट सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यामधून पुणे जिल्ह्यातील तब्बल दोन लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याने चालू महिन्याचे त्यांचे बँक खाते पैशांअभावी कोरेच राहिले आहे. सध्या या लाडक्या बहिणी बँकेत पैसे जमा झाले नाहीत म्हणून विचारणा करत आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख पेक्षा अधिक लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत पैसे सुरू झाले. पहिल्या टप्प्यामध्ये चारचाकी गाडी असणाऱ्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना वगळण्यात आले. त्यानंतर आता नव्याने यादीची छाननी सुरू करताना या योजनेतून लाडक्या बहिणींची कपात सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या जवळपास एक लाख 65 हजार लाडक्या बहिणींना त्यांचा
ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीचे वय 65 पेक्षा अधिक आहे अशा सुमारे 38 हजार लाडक्या बहिणींनादेखील चालू महिन्याच्या लाभापासून वगळण्यात आले आहे.
शासनाचे महिला बाल विकास अधिकारीदेखील कोणतीही माहिती देत नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख तीन हजार लाडक्या बहिणींच्या लाभाचे नक्की काय होणार याबद्दलचा प्रश्न अनुत्तरीत आहे.