
पंतप्रधान मोदी ज्या व्यक्तीला आपला मित्र म्हणवतात त्याच मित्रामुळे देशावर संकट आली आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच मतचोरी म्हणजे गरीब, दुर्बल आणि मागास घटकांवर अन्याय असेही खरगे म्हणाले.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत खरगे म्हणाले की पंतप्रधान ज्या लोकांना “माझा मित्र” म्हणून गर्वाने सांगतात, तेच मित्र आज भारताला अनेक संकटात ढकलत आहेत. आज आपल्या मतदार यादीत अधिकृतपणे छेडछाड केली जात आहे. लोकशाहीचा पाया म्हणजे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक. परंतु आज निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु निवडणूक आयोग त्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी आमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागत आहे.
बिहारच्या धर्तीवर आता देशभरात लाखो लोकांची मतं कापण्याचा डाव रचला जात आहे. मत चोरी म्हणजे दलित, आदिवासी, मागास, अतिमागास, अल्पसंख्याक, दुर्बल आणि गरीब यांना मिळणाऱ्या रेशनची चोरी, पेन्शनची चोरी, औषधांची चोरी, मुलांच्या शिष्यवृत्ती आणि परीक्षेची चोरी. ‘वोटर अधिकार यात्रे’मुळे बिहारच्या जनतेमध्ये याबाबत जागरूकता पसरली आणि ते खुलेपणाने राहुलजींच्या समर्थनात उभे राहिले आहेत.
दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन अपूर्ण राहिले. युवक रोजगाराशिवाय भटकतोय. नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरवली. 8 वर्षांनंतर पंतप्रधानांना आपल्या चुकीची जाणीव झाली.
आता जीएसटीमध्ये तीच सुधारणा आणली गेली ज्याची मागणी काँग्रेस पहिल्याच दिवसापासून करत होती. मोदीजींचे मत आहे की देशवासीयांनी अधिक खर्च करायला हवा, पण मागील 10 वर्षांत उत्पन्न वाढले नाही आणि फक्त महागाई वाढली आहे तर लोक अधिक खर्च कसे करणार? असा सवालही खरगे यांनी उपस्थित केला.
प्रधानमंत्री के ‘दोस्त’ ने देश को संकट में डाला pic.twitter.com/i3UWJ9xYrQ
— Congress (@INCIndia) September 24, 2025