
चंद्रपूर जिल्हातील एका आदिवासी मुलाने जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. मात्र त्याला वगळून दुसऱ्याच मुलाला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. मुलाच्या त्याचा वडिलांने प्रशिक्षकाला विचारांना केली असता अॅडजस्ट करू आणि पहिला क्रमांक देऊ असे सांगण्यात आले. वडिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हा संकुल क्रीडा स्पर्धेत अशी सेटिंग होत असेल तर गरीब विध्यार्थाना न्याय मिळेल काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात असताना संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा क्रिडा संकूल चंद्रपूर येथील जलतरण तलावावर जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडा संकूलतर्फे जलतरण प्रशिक्षक श्रीकांत बालकी हे आयोजक होते. या स्पर्धेची माहिती जिल्ह्यातील सर्व शाळांना देण्यात आली. शाळेकडून जलतरणपटु विध्यार्थी यांना त्यांच्या वयोगटनुसार स्पर्धामध्ये भाग घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या स्पर्धेत चांदा पब्लीक स्कूल दाताळा रोड चंद्रपूर या शाळेतील प्रिन्स उमेश कोडापे यांने ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश मिळविला होता. 14 वयोगटातील 50 मिटर फ्रीस्टाईल व 100 मिटर फ्रीस्टाईल या दोनही स्पर्धामध्ये त्याने सहभाग घेतला. स्पर्धा बघण्यासाठी प्रिन्सचे वडील उमेश कोडापे हे गेले होते. त्यांचा म्हणण्यानुसार
50 मिटरचे फ्री स्टाईल स्पर्धा झाली त्यावेळेस माझ्या मुलाचा क्रमांक हा प्रथम होता. त्याचा टायमिंग (46.41) होता. हे त्यांनी स्वत बघितले. 100 मिटर फ्रीस्टाईलमध्ये मुलाचा दुसरा क्रमांक आला होता, असा त्यांचा दावा आहे. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर अतिम निकाल जाहीर झाला. त्यात प्रिन्सचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
प्रशिक्षक म्हणाले अॅडजस्ट करू
आयेजक श्रीकांत बलकी यांना वडिलांनी विचारणा केली. मात्र माहिती देण्यासाठी बलकी यांनी टाळाटाळ केली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील तालुका क्रिडा अधिकारी यांना मुलावर झालेल्या अन्याय निर्दशनास आणून दिला. यानंतर बलकी यांनी कोडापे यांना फोन केला. तुमच्या मुलाचे नाव 50 मिटरचे फ्रीस्टईलमध्ये पहिल्या क्रमांकावर दाखविले नाही. मी तुमच्या मुलाला एडजेस्ट करून देतो. मात्र आता तुम्ही कोठेही जाऊ नका व कुणाकडेही तक्रार करून नका. मी तुमचे मुलाचे काम करून देतो असे सांगितले. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर एडजेस्ट करण्याची कला बलकी यांनी आत्मसात कशी केली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.