Uddhav Thackeray Marathwada Visit – लातूर ते संभाजीनगर; उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे उद्या 25 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता लातूरच्या काडगावला भेट देतील त्यानंतर 12.30 वाजता धाराशिवमधील इटकूर गावाला, दीड वाजता पारगावला भेट देतील. त्यानंतर 3.30 वाजता उद्धव ठाकरे बीडच्या कुर्ला गावाला भेट देतील. तसेच 4.30 वाजता जालन्यातल्या महाकाळ गावाला आणि 5.30 वाजता संभाजीनगरमधील रजापूर गावाला भेट देतील.