शेतकऱ्यांचा संताप पाहून सदाभाऊ खोतांनी काढला पळ, उंदरगाव ग्रामस्थांचा आक्रोश

सोलापुरातील माढा तालुक्यातील उंदरगावाला भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आज भेट दिली. या भेटी दरम्यान पूरग्रस्त ग्रामस्थांनी सदाभाऊंना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. लोकसभा निवडणुकीत झोळी घेऊन फिरत असताना या गावाने तुम्हाला हजारो रुपयांची मदत केली. भरभरुन मते दिली, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही कधीही या गावाकडे फिरकला नाहीत आज तुम्ही रिकामे हाताने विचारपूस करायला आला आहात या शब्दांत गावकऱ्यांनी खोत यांना सुनावले.

तसेच आम्हाला खायला अन्न नाही, जनावरांना चारा नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी खोतावर केली. लोकांचा रोष पाहून सदाभाऊंनी हात जोडत आपली सुटका करुन घेतली.