संभाजीनगरमध्ये गिरीजा नदीला पूर, शेतात शिरले पाणी

संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील प्रमुख असलेली गिरीजा नदीला पूर आला आहे. नदीतले पाणी पात्र सोडून बाजूच्या शेतात शिरत आहे. तसेच कान्होरी येथील पुल पाण्याखाली गेला आहे.

शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपासून सुरू असलेला पाऊस रात्रभर पडत होता. त्यामुळे कान्होरी येथील नदीला मोठे रौद्र धारण केले तसेच शनिवारी सकाळी यसगाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. कान्होरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून कापूस, मक्का पिके पाण्याखाली गेले आहे.