
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यावर टीम इंडियाने मजबूत पकड निर्माण केली असून आता केएल राहुलच्या (100) पाठोपाठ ध्रुव जुरेलनेही शतक ठोकलं आहे. 190 चेंडूंचा सामना करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतलं पहिल शतक झळकावलं आहे. याचबरोबर ध्रुव जुरेल कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील टीम इंडियाकडून शतक ठोकणारा 12वा यष्टीरक्षक ठरला आहे.
What a feeling to record your maiden Test 1️⃣0️⃣0️⃣
Updates ▶ https://t.co/MNXdZceTab#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @dhruvjurel21 pic.twitter.com/gMU5WxHajJ
— BCCI (@BCCI) October 3, 2025
वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांमध्ये संपुष्टात आणल्यानंतर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 400 हून अधिक धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेलने 210 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 125 धावांची खेळी केली. सध्या टीम इंडियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 432 धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजा (98) आणि वॉशिंग्टन सुंदर (01) नाबाद फलंदाजी करत आहेत.