
छत्तीसगडच्या बिजापूर जिह्यातील 103 नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडला. त्यांनी पोलिसांसमोर येऊन स्वतःला आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पणामध्ये 49 नक्षलवादी असे आहेत, ज्यांच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत बिजापूर जिह्यात एकूण 410 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर 421 नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.