हिंदुस्थानी शेअर बाजार उसळला

हिंदुस्थानी शेअर बाजार सोमवारी उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 582 अंकांनी वधारून 81,790 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 183 अंकांनी वाढून 25,077 अंकांवर बंद झाला. मॅक्स हेल्थकेअर, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, अ‍ॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ पाहायला मिळाली. आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदीदारी झाल्याने शेअर बाजार वाढीला चालना मिळाली.

निफ्टीतील आयटी सेक्टरमधील सर्व 10 शेअर्स वाढीसोबत बंद झाले. इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रासारख्या कंपनीत जोरदार खरेदी झाली. अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, एअरटेल, बीईएल, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएलचे शेअर्स वाढले, तर आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, अदानी पोर्टस् आणि टाटा स्टीलचे शेअर्स घसरले. सोमवारी हिंदुस्थानी रुपयांमध्ये 5 पैशांची वाढ झाली. या वाढीसोबत रुपया 88.74 रुपयांवर पोहोचला.