मोबाईलसोबत आता यूएसबी केबलही मिळणार नाही, अ‍ॅपल कंपनीच्या पावलावर सोनी कंपनीचे पाऊल

नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर जो बॉक्स मिळत होता त्यात नव्या फोनसोबत नवीन चार्जर मिळत होता, परंतु काही मोबाइल कंपन्यांनी फोनच्या बॉक्समधून चार्जर देणे बंद केले. याची सुरुवात अ‍ॅपल कंपनीने केली. त्यानंतर काही कंपन्यांनी चार्जरऐवजी केवळ यूएसबी केबल बंद सुरू केले, परंतु आता सोनी कंपनीने नव्या फोनच्या बॉक्समध्ये यूएसबी केबल देणेही बंद केले आहे.

सोनी कंपनी नवीन स्मार्टफोन सोनी एक्सपेरिया 10 सोबत बॉक्समध्ये चार्जिंग केबल देत नाही. या फोनला खरेदी केल्यानंतर चार्जर आणि केबल दोन्ही मिळणार नाही. सोनीप्रमाणे अ‍ॅपलनेही आपल्या नव्या एअरपॉड्ससोबत केबल देणे बंद केले आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक यूएसबी केबल असते. त्यामुळे त्यांना बॉक्समध्ये यूएसबी केबल देण्याची गरज नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.