
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी मुंबईत पोहोचलेल्या कीर स्टार्मर यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सोबत एक चित्रपट पाहिला. या दोघांचे पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाले. स्टार्मर यांनी यावेळी मुंबईतील प्रसिद्ध यशराज स्टूडिओला भेट दिली. कीर स्टार्मर यांनी राणी मुखर्जीसोबत नेमका कोणता चित्रपट पाहिला हे उघड झाले नाही. पंतप्रधान कीर स्टार्मर हे जवळपास 100 लोकांच्या प्रतिनिधीमंडळासोबत ब्रिटनहून हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. यामध्ये ब्रिटनमधील आयटी, ऑटो, मोबाइल, व्यापार, संस्कृती आणि अन्य क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित आहेत. स्टार्मर यांचे मुंबई विमानतळावर पोहोचताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यानंतर स्टार्मर यांनी मुंबईतील ताज महल पॅलेसला भेट दिली. यावेळी त्यांनी उद्योगपतीसोबत चर्चा केली.