
मध्य रेल्वेची लोकल सुरुवातीचे स्टेशन वगळता अन्य स्थानकांवरून संध्याकाळच्या वेळेत पकडणे कठीणच आहे, अशी चिंता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी ही चिंता व्यक्त केली. सध्या एसी लोकल सुरू झाल्या आहेत. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात. त्यामुळे प्रवाशांचे लोकलमधून पडून होणारे मृत्यू टाळता येत आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले.
कांजूर मार्ग-भांडुप दरम्यान एकाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. 2012 मध्ये ही घटना घडली. रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाने पीडिताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात या कुटुंबाने अपील याचिका दाखल केली होती.
न्या. जैन यांच्या एकल पीठासमोर ही सुनावणी झाली. संबंधित प्रवाशाचा मृत्यू लोकलमधून पडून झाला. त्याच्याकडे प्रवास तिकीट होते, असे स्पष्ट करत न्यायालयाने या कुटुंबाला 8 लाखांची नुकसानभरपाई मंजूर केली. चार जणांमध्ये या रकमेचे समान वाटप करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.






























































