ट्रेंड – बायकोशी खोटं बोलताना जपून!

संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. नवरा-बायकोमध्ये रुसवे-फुगवे सुरूच असतात. त्यामुळं जगण्यातही एक मजा असते. ‘तुम रुठी रहो, मै मनाता रहू, तो मजा जीने का और भी आता है…’ असं जे म्हणतात ते खोटं नाही. हल्ली सोशल मीडियात नवरा-बायकोची लुटूपुटूची भांडणे आणि त्यांच्यातील गमतीजमती खूपच व्हायरल होत असतात. असंच एक पोस्टर सध्या व्हायरल झालं आहे. बायकोशी बोलताना काय काळजी घ्यायची ते सांगणारं वाक्य त्यावर लिहिण्यात आलं आहे. हे वाक्य वाचून तुम्हाला हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. ते पूर्ण वाक्य असं आहे… ‘बायकोशी कधीही खोटं बोलू नका, कारण ती तुम्हाला तेच विचारते, जे तिला आधीच माहीत असतं.’ आता बोला!