
मैं तुम्हारे लिए चाँद-तारे तोड ला सकता हू… हा डायलॉग आपण सिनेमांमध्ये ऐकलेला असतो. पण हे सगळं प्रतीकात्मक असतं, प्रत्यक्षात कोणी चंद्र-तारे तोडून आणू शकत नाही हे सर्वांनाच माहीत असतं. मात्र, काही नाती अशी असतात की ती त्या चंद्रालाही पकडण्याचा प्रयत्न करतात. उत्तर हिंदुस्थानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या ’करवा चौथ’च्या सणाच्या दिवशीचा असाच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक जोडपं ट्रेनमध्ये ’करवा चौथ’ साजरा करताना दिसतंय. पत्नी चाळणी घेऊन ट्रेनच्या दरवाजात येते. तिथं उभी राहून चाळणीतून धावत्या चंद्राची छबी पकडण्याचा प्रयत्न करते आणि नंतर नवऱ्याचं दर्शन करते. त्याच्या पाया पडते. नवराही प्रेमाने तिला घास भरवून तिचं व्रत सोडवतं. https://tinyurl.com/2j3uabnj या लिंकवर हा व्हिडिओ पाहायला मिळेल.