
दिवाळीनिमित्त विविधरंगी आकाशकंदिलांनी बाजारपेठ उजळली आहे. बाजारातील प्लास्टिकचे चायना मेड कंदील गायब झाले असून त्याची जागा कापड, बाबू, ज्यूट आणि कागदापासून तयार केलेल्या पारंपारिक आकाशकंदिलांनी घेतली आहे. अगदी दीडशे रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत कंदील बाजारात उपलब्ध आहेत. यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची छबी असलेल्या कंदिलांना मोठी मागणी आहे. ऑफिसमध्ये सजावटीसाठी वापरले जाणारे छोट्या आकाराचे कंदील तीनशे रुपये डझन आहेत.