
फटाके फोडताना हे करा…
- फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
- फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडताना मोठ्या व्यक्तिंनी सोबत राहावे.
- फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
- फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तत्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
- फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा.
हे करू नका…
- इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.
- फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.
- झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके पह्डू नयेत.
- खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
- विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्या ठिकाणी फटाके पह्डू नयेत.
- घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोषणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही याची काळजी घ्यावी.