Photo – पुना मर्चंट चेंबर दिवाळी फराळ, एक किलो लाडू 190 रुपये

Photo - चंद्रकांत पालकर

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वांचीच लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. कंदील, फराळाच साहित्य, नवीन कपडे इ. खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीचे औचित्य साधत पुण्यातील पुना मर्चंट चेंबरने सुद्धा आतापासूनच कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. पुना मर्चंट चेंबरच्या वतीने स्वस्त दरात फराळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे नोकरवर्गाचा दिवाळीत फराळ खरेदीचा प्रश्न काही अंशी मिटण्याची शक्यता आहे. एक किलो चिवडा आणि एक किलो लाडूचा दर प्रत्येकी 190 रुपये असा ठेवण्यात आला आहे. तर अर्धा किलो चिवडा आणि अर्धा किलो लाडूचा दर प्रत्येकी 100 रुपये इतका असणार आहे.

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)