खुसखुशीत करंजी बनवायची असल्यास, हे करून पहा

दिवाळी म्हटले की, करंजी आली. करंजी नसेल तर दिवाळीचा फराळ पूर्ण होत नाही. दिवाळीत खुसखुशीत करंजी बनवताना सर्वात आधी मैदा, बारीक रवा आणि तूप याचे योग्य प्रमाण वापरा. तसेच करंजीमध्ये लागणारे आतील सारण तयार करताना ते पूर्णपणे थंड होऊ द्या.

अर्धा किलो मैद्यासाठी जवळपास अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप तुपाचा वापर करा. गरम सारण भरल्यास करंजी मऊ पडू शकते. सारणात नारळ, गूळ, रवा आणि सुका मेवा यांचे मिश्रण वापरा. सारण जास्त घट्ट किंवा पातळ नसावे. करंजीच्या पुऱ्या लाटताना त्यामध्ये एकसारखे थर येतील अशा पद्धतीने लाटा. करंज्या सोनेरी होईपर्यंत तळल्यास खुसखुशीत होतील.