मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी, जुना मार्ग वापरण्याचा अनेकांचा सल्ला

H

सणासुदीचा हंगाम सुरू होताच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

सोशल मिडियावर काही युजर्संनी या वाहतुक कोंडीचे व्हिडीओ पोस्ट करून याबाबात तक्रार केली आहे. दिवाळीचे दिवे नाही, फक्त लोणावळ्यापर्यंत ब्रेक लाईट्सच दिसतायत. मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास टाळा असे या युजरने म्हटले आहे.

दरम्यान, काही युजर्संनी पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड ट्रॅफिक आणि विकेंड रशमुळे 15-20 मिनिटांचा उशीर होत असल्याचे सांगितले. तर मुंबईकडे प्रवास करणाऱ्या आणखी एका प्रवाशाने व्हिडिओ शेअर करत इतरांना जुना महामार्ग वापरण्याचा सल्ला दिला.

त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने जुना मुंबई–पुणे महामार्ग वापरण्याचा सल्ला दिला. सकाळी ४ वाजता उठलो आणि मॅप्सवर घाट विभागाजवळ प्रचंड कोंडी दिसली. मी ठाण्यातून साडेचार वाजता निघालो आणि खालापूर टोलनाक्यानंतर जुना मुंबई–पुणे महामार्ग घेतला. त्या ठिकाणापासून माझा अंदाजे वेळ ४५ मिनिटांनी कमी झाला. सकाळी ८ वाजण्यापूर्वीच विमाननगर पार केले, तेही कुठलाही स्टॉप ने घेता असे या युजरने म्हटले आहे.