
हिंदुस्थानातील लोकांनी स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. परंतु, मोदी यांच्या आत्मनिर्भर भारला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत एप्रिल-सप्टेंबरमध्ये हिंदुस्थानात होणारी आयात वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत हिंदुस्थानात 16.26 अब्ज डॉलरच्या किंमतीच्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात देशात 358.85 अब्ज डॉलर होते. जे 2025 मध्ये 375.11 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे.
चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मशीनरी आहेत. एकीकडे हिंदुस्थान आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. त्यातही चीनमधून जास्त होणारी आयात हे देशासाठी नक्कीच शुभसंकेत नाहीत. चीन सध्या जगातील सर्वात मोठा निर्यात करणारा देश बनला आहे. हिंदुस्थानने तिमाहीत इलेक्ट्रॉनिक्स, मशीनरी आणि सिल्वर उत्पादनाची आयात सर्वात जास्त केली आहे.
सर्वात जास्त आयात केल्या जाणाऱ्या वस्तू
मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑर्गनिक केमिकल्स, प्लास्टिक, ऑटोमोबाईल्स ऑप्टिकल, अॅल्युमिनियम, ग्लासवेअर, लोखंड आणि स्टील, ज्वेलरी आणि जेम मॅकेनिकल अप्लायन्सेस, मेडिकल डिव्हाईस
चीन सर्वात मोठा निर्यात करणारा देश
हिंदुस्थानने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत सर्वात जास्त आयात चीनमधून केली आहे. हिंदुस्थानने चीनमधून जवळपास 62.89 अब्ज डॉलरचे सामान आयात केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 11.2 टक्के वाढ झाली आहे. तर दुसऱ्या नंबरवर यूएई देश आहे. येथून हिंदुस्थानने 33.03 अब्ज डॉलर किंमतीचे सामान आयात केले आहे. रशियाकडून 31.12 अब्ज डॉलरचे सामान आयात केले असून हिंदुस्थानला निर्यात करणारा रशिया तिसऱ्या क्रमांकावरील देश आहे.



























































