
त्रिपुरातील मोलसोम जमातीच्या लोकांचा धर्मपरिवर्तनापासून बचाव करणाऱ्या मदन हरी मोलसोम यांचा माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या, शनिवारी सायंकाळी 4 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे.
माय होम इंडियाचे संस्थापक सुधीर देवधर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वन इंडिया पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन केले जाते. यंदा या पुरस्काराचे पंधरावे वर्ष आहे. या सोहळय़ाला पेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी पोद्दार ग्रुप ऑफ पंपनीचे नरेंद्र पोद्दार तर संयोजक मुंबईतील वनवासी कल्याण आश्रमचे सचिव देवेंद्र आतकरी असणार आहेत.





























































