असं झालं तर… पीएफचे पैसे अडकले तर…

कंपनी सोडल्यानंतर जर पीएफचे पैसे कंपनीत अडकून पडले असतील तर ते पैसे काढण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. ते पैसे काढता येऊ शकतात.

सर्वात आधी ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करा. ‘निक्रिय’ खात्याच्या मदत केंद्रावर जा. तुमचा आधार, पॅन, बँक खाते क्रमांक यांसारखी केवायसीची माहिती द्या.

ईपीएफओ कर्मचारी तुमच्या अर्जाची तपासणी करतील आणि त्यावर कारवाई करतील. तुम्ही तुमच्या पूर्वीच्या कंपनीच्या संबंधित पीएफ कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करा.

जर तुम्ही कंपनी बदलली असेल आणि नवीन कंपनीत पीएफ हस्तांतरित केला नसेल, तर तुमचे पीएफ खाते निक्रिय होऊ शकते. त्यामुळे वेळीच याची काळजी घ्या.

कंपनीने पीएफची रक्कम वेळेवर जमा न केल्यास तुम्हाला दंड आणि व्याजाचा भुर्दंड लागू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये कंपनीवर फौजदारी कारवाईदेखील केली जाऊ शकते.