
किंचिदाश्रयसंयोगाद् धत्ते शोभामसाध्वपि।
कान्ताविलोचने न्यस्तं मलीमसमिवाञ्जनम् ?
एखाद्या क्षुल्लक वस्तूलासुद्धा चांगल्याच्या सान्निध्यामुळे शोभा प्राप्त होते. सुंदरीच्या डोळ्यात घातल्याने काळे काजळही कसे शोभून दिसते. आपण कोणाच्या आश्रयाने राहतो, कोणाच्या संगतीत राहतो ह्यामुळे अनेकदा आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. काजळ हे कृष्णवर्णीय आहे. तसे ते फार किमतीही नाही, किंवा त्याची गणना सुंदर वस्तूंमध्ये होते असेही नाही. पण एखाद्या सुंदरीच्या डोळ्यांमध्ये त्याला स्थान मिळाले की तेच काळे काजळ सुंदर भासू लागते. एखादी मूलत फार गुणवान नसलेली व्यक्तीही याच प्रकारे योग्य व्यक्तीचा आश्रय मिळाला तर सार्थकता प्राप्त करते.
डॉ. समीरा जोशी





























































