अदानीच्या हायटेन्शन लाइनला वाड्यातील शेतकऱ्यांचा विरोधः प्रांत कार्यालयासमोर २२ दिवस बिऱ्हाड आंदोलन

अदानी पॉवरसाठी हायटेन्शन लाइन टाकणाऱ्या महावितरणने पालघर जिल्ह्याच्या वाड्यातील शेतकऱ्यांवर जुलमाचा वरवंटा फिरवला आहे. वाडा, विक्रमगड आणि जव्हार येथील शेतकऱ्यांच्या शेतांमधून अदानीसाठी या हायटेन्शन लाइन जात आहेत. त्यासाठी शेतांमध्येच वाहिन्यांचे मनोरे उभारले जात असल्याने टॉवर च्या खालील आणि आसपासची शेतजमीन नापीक होणार आहे. याविरोधात वाड्यातील शेतकऱ्यांनी प्रांत कार्याल यासमोर आपल्या मुलाबाळांसह बिहाड आंदोलन सुरू केले असून नुकसानभरपाईच्या नावाखाली तोंडाला पाने पुसू नका, अशी मागणी केली आहे. मात्र आंदोलन सुरू होऊन २२ दिवस उलटले तरी सरकारला पाझर फुटला नसल्याने हे सरकार फक्त अदानीसाठी काम करते काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

अदानी पॉवर कंपनीच्या दोन व महावितरणची एक अशा तीन उच्च दाबाच्या वाहिन्या टाकण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक भागानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळा दर देऊन त्यांची फसवणूक केली आहे. ‘एक जिल्हा एक भाव’ अशी मागणी करत शेतकऱ्यांनी धर्मवीर विचार मंच यांच्या माध्यमातून हे क्हिाड आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा २२ वा दिवस होता. मात्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आला नाही.

नवसारी-पडघे, बोईसर ते पुणे व खावडा येथे पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड विद्युत वाहिनी प्रकल्पांतर्गत अदानी व महावितरणच्या वतीने अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व मनोरे टाकण्यात येत आहेत.

तब्बल ७६५ केव्ही क्षमतेच्या या वाहिन्या असून या प्रकल्पामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. एकीकडे अवकाळी पावसामुळे भातशेतीची नासाडी झाली असताना आता या विद्युत वाहिन्यांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार.

ऐन दिवाळीतदेखील बाधित शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर बिन्हाड आंदोलन सुरूच ठेवले. सणासुदीलाही ते घरी गेले नाहीत. सरकार आमची दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांचे नेते मिलिंद पष्टे यांनी केला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रती चौरस मीटर १० हजार रुपये असा समान भाव देण्यात यावा.

भूसंपादनाच्या नोटिसाही पाठवाव्यात.

प्रकल्पग्रस्तांना दाखले.

विद्युत वाहिनी व मनोराखालील जागा भाडेतत्त्वावर घ्यावी.

बाधितांना पाच पटीने मोबदला.

एक रकमी मोबदला दिल्याशिवाय काम सुरू करू नये.