
शाळेच्या कँपसमधील मशिदीत नमाज पठण सुरू असताना भीषण स्फोटाची घटना शुक्रवारी इंडोनेशियातील जकार्तामध्ये घडली. या स्फोटात 54 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर जकार्ता येथील केलापा गाडिंग येथे ही घटना घडली. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मशिदीत दुपारच्या सुमारास नमाज सुरू असताना दोन जोरदार स्फोट झाले. घटनास्थळावरून बुलेट्सप्रुफ जॅकेट्स, बंदुका, रायफल्स आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्फोटात मशिदीचे मोठे नुकसान झाले नाही. दरम्यान, जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस स्फोटाबाबत अधिक तपास करत आहेत.


























































