यंदा हिवाळ्यात क्रिमी मशरूम सूपचा आस्वाद घ्या

हिवाळ्यात आपण अनेकदा कंफर्ट फुड चा विचार करतो. त्यासाठी आपण सूपला आहाराचा भाग बनवू शकतो. कारण सूप भरपूर पोषक तत्वे प्रदान करते आणि ते पचण्यास हलके असते. त्यात कमीत कमी तेल आणि मसाले वापरले जातात, ज्यामुळे ते शरीरासाठी निरोगी असते. या हिवाळ्यात, तुम्हीही घरच्या घरी सोप्या पद्धतीने क्रिमी मशरूम सूप ट्राय करु शकता, जे तुमच्या कुटुंबाला आवडेल आणि लहान मुलेही ते आनंदाने खातील. मशरूम हे अनेक वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असतात आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. मशरुम सामान्यतः शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे.

मशरूम करी हा हिंदुस्थानात एक लोकप्रिय पदार्थ आहे, परंतु तुम्ही त्याचे सूप देखील घरी बनवून बघा. मशरूम सूप हिवाळ्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तुमच्या स्नायू, हाडे आणि पचनासाठी फायदेशीर आहे. जाणुन घ्या क्रिमी मशरूम सूपची रेसिपी .

साहित्य
क्रिमी मशरुम, व्हाइट बटन मशरुम, शिकाटे मशरुम, पोर्सिनी मशरुम, यापैकी कोणत्याही प्रकारचे मशरुम वापरु शकता.
– 1 वाटी चिरलेला कांदा
– 2 चमचे बारिक चिरलेला लसुन
– 2 चमचे बटर
– अर्धा चमचा ड्राइहर्ब्स मिक्स
– 1 वाटी भाज्यांचे पाणी ( व्हेजीटेबल स्टॉक पर्यायी )
– 2 चमचे फ्रेश क्रिम
– चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर

कृती

सर्वप्रथम जाड बुड असलेले भांड्यात बटर गरम करुन त्यामध्ये लसुन परतवून घ्या. लसुन नरम झाल्यावर कांदा परतवून घ्या. कांदा धिम्या आचेवर शिजवा जेणेकरुन कांदा जळणार नाही.

 

कांदा शिजल्यानंतर मशरुम घाला आणि मशरुम थोडे नरम करुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये मिक्स हर्ब्स आणि काळी मिरी पावडर आणि व्हेजिटेबल स्टॉक घाला. आणि हे मिश्रण 4 ते 5 मिनिटे उकळवून घ्या.

 

 

 

तयार केलेलं मिश्रण थंड करुन एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.

 

तयार केलेले पेस्ट एका खोलगट पॅनमध्ये ओता आणि त्यात एक कप पाणी किंवा व्हेजीटेबल स्टॉक आणि फ्रेश क्रीम घाला.

 

मशरूम पेस्ट मध्यम आचेवर कमीत कमी ३ मिनिटे शिजवा. नंतर, शेवटी मीठ घाला. क्रिमी सूप तयार होईल. तुम्ही हे सूप टोस्ट केलेल्या मल्टीग्रेन ब्रेडसोबत सर्व्ह करू शकता.