Bigg Boss चा नाद अंगाशी आला, बस चालवताना व्हिडीओ पाहिल्यामुळे चालक नोकरीला मुकला

देशभरात सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने ड्रायव्हरचा बेजबाबदार किंवा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत आहे. लांबच्या प्रवासात अनेकदा ड्रायव्हर्स झोप लागू नये म्हणून किंवा मनोरंजनासाठी मोबाईलवर गाणी, पिक्चर पाहतात. यामुळेच अपघात होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. खासगी बसचा ड्रायव्हर बस चालवताना रिआलिटी शो बघत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

सदर व्हिडीओ हा कॉन्टेंन्ट क्रिएटर नागेश माने याने सोशल मीडियावर शेअर करत ड्रायव्हरचा बेजबाबदाराचा पर्दाफाश केलाय. या व्हिडीओमध्ये ड्रायव्हर 80 च्या स्पिडने बस चालवत असून प्रवासादरम्यान Bigg Boss बघत आहे. हा रात्रीचा प्रवास असून मुंबई ते हैदराबाद असा या बसचा मार्ग होता. दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत नागेशने ‘ अपघात होण्यामागच्या कारणांमधील हे एक महत्त्वाचे कारण’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच हा व्हि़डीओ 27 ऑक्टोबरचा असल्याचेही त्याने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagesh Mane (@nagesh_2161)

दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ड्रायव्हक स्वत:ला झोपेपासून वाचण्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात… असे एका युजरने म्हटले आहे. एका युजरने त्याच कंपनीच्या बसचा त्याचा गेल्या वर्षीचा अनुभव शेअर केला आहे. गेल्या वर्षी बेदरकारपणे बस चालवल्यामुळे त्याच्या वडिलांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप त्याने केला.

व्हायरल पोस्टनंतर बसच्या कंपनीने सविस्तर माफी मागितली. ड्रायव्हरला ड्युटीवरून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर केले. “प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्रायोरिटी आहे आणि आम्ही अशा बाबी अत्यंत गांभीर्याने घेतो,” असे कंपनीने म्हटले आहे. “अंतर्गत चौकशीनंतर, संबंधित ड्रायव्हरला त्याच्या निष्काळजी वर्तनामुळे तात्काळ ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे.”