
वयात येताना बहुतांशी मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्सचे डाग नाहीसे करण्याासाठी नानाविध रासायनिक उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु पिंपल्सच्या डागांवर कडुलिंब हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. कडुलिंबाच्या झाडाचे सर्व भाग, त्याची पाने, फुले, फळे, मुळे आणि साल आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे.
प्राचीन काळापासून जळजळ, संसर्ग, ताप, त्वचारोग आणि दंत समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर होत आला आहे. कडुलिंबाची पाने कडू असतात. परंतु ही पाने आपल्या त्वचेसाठी रामबाण आहेत. कडुलिंबाची पाने रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील खाल्ली जातात. या पानांच्या समृद्ध औषधी गुणधर्मांमुळे, कडुलिंबाचा वापर अनेक उत्पादने आणि औषधांमध्ये केला जातो. ते डाग, मुरुमे आणि संसर्ग यासारख्या त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यास मदत करते.
कडुलिंबाची पाने आणि त्यातील घटकांमध्ये रोगप्रतिकारक-समायोजित, दाहक-विरोधी, उच्च रक्तदाबविरोधी, अल्सर-विरोधी, मलेरियाविरोधी, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
दुपारच्या जेवणात ताक पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल
त्वचेला मऊ मुलायम ठेवण्यासाठी आणि मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय करायलाच हवा. कडुलिंबाची पाने बारीक करा आणि थोडी मुलतानी माती, चिमूटभर हळद, चंदन पावडर, गुलाबजल आणि थोडी कोरफड घालून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावावा. २० ते २५ मिनिटे ठेवल्यानंतर, तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा. हा फेस पॅक काही दिवसांत चांगले परिणाम देतो.
कडुलिंबाचे तेल आणि त्याच्या पानांचा रस टाळू निरोगी ठेवतो आणि संसर्ग होण्यापासून रोखतो. वारंवार कोंडा होत असल्यास, कडुलिंबाचे तेल टाळूवर लावणे फायदेशीर आहे. उवा दूर करण्यासाठी देखील ते प्रभावी आहे.
डिटॉक्स म्हणजे नेमके काय? याकरता कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करायला हवा
कडुलिंबाची साल दगडावर घासून, गुलाबपाण्यात मिक्स करावी. हे मिश्रण मुरुम किंवा डाग असलेल्या ठिकाणी लावावे. पुरळ किंवा बारीक मुरुम यांसारखे त्वचेचे संक्रमण कमी करण्यास देखील ते उपयुक्त आहे. त्वचेला खाज येत असेल तर कडुलिंबाच्या सालीची पेस्ट देखील लावता येतो.
स्वस्थ त्वचा राखण्यासाठी, मूठभर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा, ते गाळा आणि नंतर कोमट झाल्यावर त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमची त्वचा चेहऱ्यापासून ते हातपायांपर्यंत निरोगी राहील. यामुळे खरुज आणि खाज यासारख्या समस्यांचा धोका खूपच कमी होतो.
आहारामध्ये शेवगा समाविष्ट करताना कोणकोणते पदार्थ बनवता येतील
वारंवार मुरुमे येत असतील तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या येऊ शकतात. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी ३-४ कडुलिंबाची पाने चावू शकता. हे रक्त शुद्ध करते, नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा प्रदान करते आणि त्वचा देखील स्वच्छ करते.



























































