
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रपृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 92 वर्षीय प्रेम चोप्रा यांना हृदयाशी संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या शरीरात संसर्ग पसरल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. आता त्यांच्या प्रपृतीत सुधारणा असल्याचे कळत आहे.
वृत्तानुसार, प्रेम चोप्रा यांच्यावर सध्या डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील उपचारांसाठी त्यांना पुढील दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांची प्रपृती सध्या स्थिर आहे, परंतु, वैद्यकीय पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.




























































