एनएसयूआयचे नोकरी द्या अभियान

महायुतीच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून सरकारी नोकर भरतीही केली जात नाही. निवडणुकीत तरुणांना नोकरी, शिष्यवृत्ती देण्याबरोबरच अनेक आश्वासने दिली पण त्यातील एकही भाजप सरकारने पूर्ण केले नाही. यामुळे एनएसयूआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या, हे अभियान राज्यभर चालवणार असल्याची माहिती एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी दिली.