
दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रविवार असो अथवा कोणता सण पार्कात तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांची हमखास गर्दी पाहायला मिळते. अनेक जण दररोज चालण्यासाठी, खेळण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि शांतता अनुभवण्यासाठी पार्कात येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. याच वर्दळीच्या ठिकाणी एक संतापजनक प्रकार घडला आहे. तरुणी मागे बसलेली असताना एका माथेफेरूने मैदानातच सर्वांच्या समोर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
दादरमध्ये एक तरुणी बाकड्यावर कानाला हेडफोन लावून गाणी एकताना शांतता अनुभवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तरुणीच्या मागेच एक व्यक्ती मैदानावर लावण्यात आलेल्या जाळीवर लघुशंका करताना दिसत आहे. shivajipark_
आणि dadarmumbaikar या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी भडकले असून अनेकांनी सदर व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.




























































