प्रसिद्ध वृत्तपत्रात बातमी ऐवजी छापला ‘Prompt’, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ChatGPT ला योग्य तो प्रॉम्प्ट देऊन आपल्याला हवी ती माहिती अगदी सविस्तर उपलब्ध होतेय. त्यामुळे कन्टेंन्ट राइटर्सही याचा पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. पाकिस्तानातही AI चा वापर वाढत चाललाय. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने देखील AIचा वापर केला आणि ते वृत्त देशभरात व्हायरल झाले. त्यामुळे आता पाकिस्तान आणि तेथील एका प्रसिद्ध वृत्तपत्राची व ते वृत्त लिहिणाऱ्याची खिल्ली उडवली आहे.

एआयच्या या युगात बरोबरी करण्यासाठी पाकड्यांनी केलेला प्रयोग चांगलाच फसला आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनमध्ये मायना छापण्याऐवजी थेट ChatGPT ला दिलेला Prompt चं छापून आलाय. त्यामुळे पाकड्यांवर टीका केली जात आहे. हा प्रॉम्प्ट 12 नोव्हेंबरच्या बिझनेस पेजवर छापून आलाय. त्यात ऑक्टोबरमध्ये वाहन विक्रीत वाढ झाल्याचे वृत्त होते. हा लेख ChatGPT च्या मदतीने लिहिण्यात आलाय. यामध्ये “जर तुम्हाला हवे असेल तर, मी तुमच्यासाठी एक फ्रंट-पेज स्टाइलचा लेख तयार करू शकतो. मी काही आकडेवारी देऊ शकतो आणि इन्फोग्राफिक लेआउट तयार करू शकतो. हे वाचकांना अधिक प्रभावित करेल. मी असे काही बदल करावेत, असे तुम्हाला वाटते का?” असा Prompt छापून आल्याने या वृत्तपत्रावर टीका केली जात आहे.

वर्तमानपत्रात प्रॉम्प्ट प्रकाशित होताच, तो लेख व्हायरल झाला. पाकिस्तानमधील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लेखकांना सुनावले आहे. हे खरच डॉनचे वृत्त आहे का? त्यांचे लेखन इतके कसे बिघडले? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. हे लोक जगाला मीडियाचे महत्त्व शिकवतात आणि तरीही ते स्वतः एआय वापरून तयार केलेले लेख प्रकाशित करतात, असे अनेक प्रश्न आता पाकिस्तानच्या या वृत्तसंस्थेवर उपस्थित केले जात आहेत.

पाकिस्तानमधील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र

डॉनची स्थापना 1941 मध्ये मोहम्मद अली जिना यांनी केली होती. हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र आहे.