लालूंना किडनी देणारी कन्या रोहिणी यांची कुटुंब आणि राजकारणाला सोडचिठ्ठी, बिहारच्या पराभवानंतर आरजेडीला दुसरा धक्का

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना दुसरा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. लालू यादव यांना किडनी देणारी त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी नाते तोडत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी राजकारणालाही रामराम ठोकला आहे.

या निर्णयाचे खापर त्यांनी आपले बंधू तेजस्वी यादव, खासदार संजय यादव व रमीझ यांच्यावर फोडले आहे. त्यांच्यामुळेच मला घर सोडावे लागले. त्यांना पराभवाची जबाबदारी नको आहे. त्यांचे नाव घेण्याचीही चोरी झाली आहे. या लोकांना पराभवाचा दोष दिला तर बदनामी केली जाते. तुम्हाला चपलेनेही मारले जाऊ शकते, असे रोहिणी म्हणाल्या.