
कोलकाता कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानवर 30 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात हिंदुस्थानपुढे 124 धावांचे आव्हान ठेवले होते. खेळपट्टीचा नूर पाहता हे आव्हानही डोंगराएवढे ठरणार असे वाटत होते आणि झालेही तसेच.
हिंदुस्थानचा संपूर्ण संघ 93 धावा करू शकला आणि आफ्रिकेने विजय मिळवला. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे मैदानात उतरू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मर याने दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेतल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पहिल्या डावात हिंदुस्थानने आफ्रिकेला 159 धावामध्ये गुंडाळले होते. हिंदुस्थानला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती, मात्र एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे हिंदुस्थानचा संघ 189 धावा करू शकला. हिंदुस्थानला 30 धावांची नाममात्र आघाडी घेतली. त्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या. कर्णधार तेंबा बावुमा याने नाबाद 55 धावांची खेळी केली. हीच खेळी निर्णायक ठरली.
धावफलक
दक्षिण आफ्रिका – 159 आणि 153
हिंदुस्थान – 189 आणि 93






















































