छत्तीसगडच्या सुकमामध्ये चकमक, 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार झाले. राज्यातील तुमलपाड गावाजवळ ही चकमक घडली. बस्तरचे पोलीस महासंचालक पी सुंदरराज यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. सुकमा पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांच्या मृत्युची पुष्टी केली. मृतांमध्ये मिलिशिया कमांडर आणि स्नायपर स्पेशालिस्ट माधवी देवा यांचा समावेश आहे.

मृतांमध्ये पोद्यम गांगी आणि सोडी गांगी या दोन महिला माओवादींचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा राखीव गार्डच्या पथकांनी घटनास्थळावरून .303 रायफल, बीजीएल लाँचर्स आणि दारूगोळा जप्त केला आहे. पुढील शोध मोहीम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.