
आजकाल कुठल्याही पर्यटनस्थळावर तरुण पिढी रील बनविताना दिसते. रील बनविताना अनेक मजेदार प्रसंग घडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुलगी झाडाच्या फांदीवर झोपून रील बनवित असते. एका गाण्यावर छान पोझ देते. त्याच वेळी अचानक वरून एक माकड तिच्या अंगावर उडी मारते. तरुणी घाबरून लगेच खाली उतरते आणि माकड वर निघून जाते. हे सगळे अगदी काही सेपंदांत घडते. पाहणारे काही क्षण स्तब्ध होतात, पण नंतर सगळेच हसायला लागतात.


























































