शिवसेनाप्रमुखांना आदरांजली! शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे नतमस्तक; शिवसेनाप्रेमी, शिवसैनिकांची गर्दी

ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनगटात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी शिवतिर्थावरील स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार सुनिल प्रभु, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार बाळा नर, आमदार हारूण खान, सुरज चव्हाण, माजी आमदार प्रकाश फातर्पैकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विनोद घोसाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शिवसेनाप्रमुखांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ज्वलंत विचार दिले. शिवसेनाप्रमुखांनी दिलेले हेच विचार घेऊन हजारोंचा जनसमुदाय आज शिवतीर्थावर दाखल झाला आणि स्मृतिस्थळावरील शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी अमर रहे, बाळासाहेब अमर रहे…. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…एकच ब्रॅण्ड… ठाकरे ब्रॅण्ड अशी घोषणाबाजीही करण्यात आली.