
ज्वारीची किंवा बाजरीची गोल भाकरी बनवायची असेल तर सर्वात आधी एका भाकरीसाठी पुरेशा प्रमाणात पीठ घ्या. त्यासोबत योग्य प्रमाणात पाणी घ्या. पिठात जास्त किंवा कमी पाणी घालू नका. हे दोन्ही मिसळल्यानंतर पीठ चांगले मिसळा. कणीक जितकी चांगली मळली जाईल, तितकी भाकरी चांगली बनेल, हा भाकरीसाठीचा नियम आहे.
भाकरीसाठी बिडाचा तवा उत्तम मानला जातो. कारण तो उष्णता समान प्रमाणात देतो आणि भाकरी चिकटत नाही. तवा गरम झाल्यावरच भाकरी टाका. एका बाजूने भाजल्यानंतर ती पलटा आणि दुसरी बाजूही खरपूस भाजा. भाकरी दोन्ही बाजूंनी भाजल्यानंतर ती थेट चुलीच्या किंवा गॅसच्या आचेवर ठेवून फुगवून घ्या.
































































