
हरयाणाच्या नूंह जिल्ह्यात एका प्री वेडिंग डा्न्स प्रोग्राममध्ये एका व्यक्तीने महिला डान्सरसोबर गैरवर्तन केले. त्यानंतर स्टेजवर जबरदस्त मारहाण झाली आणि एकच गोंधळ उडाला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरयाणातील लल्लू यांचा मुलगा एजाज याचे लग्न असल्याने आदल्या दिवशी डान्सचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी मेवातीहून तीन डान्सरना बोलावले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रविवारी रात्री पायल चौधरी नावाची डान्सर तिचा डान्स करत असताना एजाजचे काका तिच्या जवळ गेले आणि अश्लील हावभाव करत तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. स्पर्श झाल्याने संतापलेल्या डान्सरने त्यांना स्टेजवरच कानाखाली मारले. त्यावेळी तिथे आणखी दोन डान्सर डान्स करत होत्या. शेकडो माणसे त्यावेळी उपस्थित होती. त्या दरम्यान संतापलेल्या काकाने पायल चौधरीच्या कानाखाली मारली. हे भांडण वाढले आणि दोन्ही पक्षांमध्ये मारहाण सुरु झाली. क्षणभरात स्टेजवर बरीच लोकं जमा झाली. त्यांनी त्या डान्सरलना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला.
A dancer is seen getting #assaulted after she #objected to an inappropriate touch — and this video has left #Nuh deeply divided.⁰What began as a pre-wedding #celebration turned into a violent #brawl when the groom’s uncle allegedly tried to molest the performer and she #slapped… pic.twitter.com/mX7IQTDywp
— Dr. Leena Dhankhar (@leenadhankhar) November 18, 2025
डान्सरसोबत असलेल्या सहाय्यक पथकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी त्यांच्यावरही हल्ला केल्याचा आरोप आहे. गोंधळा दरम्यान, तिन्ही डान्सर स्टेजवरून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. यात एक डान्सर जखमी झाली. एकाने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





























































