किमान आम्हाला तरी कागदपत्रे पुरवायला हवीत! न्यायालयाने सीबीआयला सुनावले

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी ज्या मुद्दय़ावर युक्तिवाद केला जाणार आहे त्याबाबतचा लेखी युक्तिवाद इतर प्रतिवाद्यांना न पुरवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआयला फटकारले. तुम्ही पेंद्रीय तपास यंत्रणा आहात, किमान आम्हाला तरी कागदपत्रे पुरवायला हवीत, असे सुनावत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 5 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. गृहमंत्री अमित शहांसह इतर जण आरोपी असलेल्या या प्रकरणावर पुढील महिन्यापासून अंतिम युक्तिवादावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी गुजरातमधील आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी.जी. वंझारा, एम.एन. दिनेश आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र यातील काही अधिकाऱयांची या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली होती. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.