
जम्मू-कश्मीर पोलिसांच्या ‘स्टेट इन्व्हेस्टिगेशन युनिट’ने काश्मीर टाइम्सच्या कार्यालयावर आज धाड टाकली. त्यात एके-47 रायफलची काडतुसे हँडग्रेनेडच्या पिना आणि पिस्तुलचे काही राऊंडस जप्त करण्यात आले. देशविरोधी कारवायांना मदत केल्याच्या आरोपांनंतर ही कारवाई झाली.
कार्यकारी न्यायदंडाधिकाऱयांच्या उपस्थितीत छापेमारी झाली. कार्यालयातील संगणकांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी ‘एके’ 47 ची 14 रिकामी काडतुसे, 3 जिवंत काडतुसे, 4 ग्रेनेड सेफ्टी पिना, 3 पिस्तुलीचे राऊंड जप्त करण्यात आले. काश्मीर टाइम्स फुटिरतावादी समर्थक वेद भसीन यांनी 1954 रोजी सुरू केले होते. त्यांच्या पश्चात मुलगी अनुराधा भसीन वृत्तपत्राचा कारभार पाहतात.





























































