
वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी आणि वेगवान प्रवासासाठी या वर्षीच्या डिसेंबरअखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच तेथून मेट्रो-1 चा वापर करून एअरपोर्ट स्थानक-3 मधून थेट कुलाब्यापर्यंतदेखील जाऊ शकतील. त्याचबरोबर, नवीन वर्षात मीरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध होईल. दहिसर-काशीमिरा मेट्रो डिसेंबर- 2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई-विरार मेट्रो लाइनचे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई-विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते
दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळाल्यास डिसेंबरअखेरपर्यंत ही सेवा सुरू होईल.




























































