
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आतापर्यंत या घटनेत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे नवीन अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यापूर्वी आरोपी उमरच्या फोनमधून काही धक्कादायक व्हिडीओ क्लीप मिळाल्या होत्या. आता डॉ. मुजम्मिलच्या फोनमध्ये अनेक व्हिडीओ सापडले आहेत.
स्फोटाच्या आदल्या दिवशी हरयाणातील फरीदाबादमधून अटक करण्यात आलेल्या संशयित डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून यापूर्वी एक डायरी आणि नोटबुक सापडली होती. आता त्याच्याच मोबाईल फोनमधून तब्बल 200 व्हिडीओ सापडले आहेत. तपासात असे दिसून आले आहे की मुजम्मिल, आदिल, शाहीन आणि इरफान या डॉक्टरांच्या फोनवरून डिलिट केलेला डेटाही पुन्हा रिकव्हर करण्यात आला आहे. यामध्ये उमरच्या मोबाईलमध्ये स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला त्याचा एक व्हिडीओ आढळून आला. तर मुजम्मिलच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त व्हिडीओ आढळून आले आहेत.
मुजम्मिलच्या मोबाईलवर जवळपास 200 व्हिडिओ सापडले असून यामध्ये JESH प्रमुख मसूद अझहर, असगर, इतर जैश कमांडर आणि अनेक ISIS शी संबंधित दहशतवाद्यांच्या भाषणांचे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. यापैकी सुमारे 80 व्हिडिओ दहशतवादी प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवणे यांसंबंधित संशोधनावर आधारित आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि इतर अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणांचे व्हिडिओ देखील मुजम्मिलच्या फोनमध्ये सापडले आहेत.
दिल्ली कार स्फोटापूर्वी दहशतवादी उमरने बनवला खळबळजनक व्हिडिओ, वाचा नेमकं काय म्हणाला?

























































